पॅरिस : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आणखी एक पदक जमा झाले असून थाळी फेकमध्ये योगेश कथुनियाने रौप्यपदक जिंकले आहे. त्याने पुरुषांच्या थाळी फेकमध्ये एफ५६ स्पर्धेत रौप्य पदक ंिजकले. योगेश कथुनियाचा पहिला थ्रो ४२.२२ मीटर होता. यानंतर, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा अनुक्रमे ४१.५० मीटर, ४१.५५ मीटर, ४०.३३ मीटर आणि ४०.८९ मीटर होता.
२७ वर्षीय योगेशने पहिल्याच प्रयत्नात ४२.२२ मीटर थाळी फेकली, जो त्याचा सर्वोत्तम प्रयत्न होता. या स्पर्धेत ब्राझीलच्या बतिस्ता डॉस सँटोस क्लाउडनीने सुवर्णपदक जिंकले. त्याने ४६.८६ च्या सर्वोत्तम थ्रोसह ही कामगिरी केली. बॅटिस्टाचा हा थ्रो पॅरालिम्पिक खेळांच्या इतिहासातील या स्पर्धेतील सर्वोत्तम थ्रो ठरला. दुसरीकडे, ग्रीसच्या त्झोनिस कॉन्स्टँटिनोसने ४१.३२ मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह कांस्यपदक जिंकले.
आज पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेच्या पाचव्या दिवशी योगेश कथुनियाने रौप्य पदक जिंकून इतिहास रचला. खरंतर, योगेश कथुनियाने यापूर्वी टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये रौप्य पदक जिंकले होते. अशा प्रकारे त्याने सलग दुस-या पॅरालिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले आहे. भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत १ सुवर्ण, ३ रौप्य पदके आणि ४ कांस्य पदके जिंकली आहेत.