22.3 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeमहाराष्ट्रट्रकमधून ८० कोटींची चांदी जप्त

ट्रकमधून ८० कोटींची चांदी जप्त

निवडणूक आयोगाच्या पथकाची सर्वांत मोठी कारवाई

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रात निवडणूक आयोगाच्या पथकांकडून राज्यभरात कारवाई केली जात आहे. अनेक ठिकाणी रोकड रक्कम, सोने, चांदी आणि दारूचा साठाही जप्त करण्यात आला. मतदानाच्या ४ दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांना मोठे यश मिळाले. एका ट्रकमधून ८,४७६ किलो चांदी जात होती. त्याची किंमत तब्बल ८० कोटी रुपये आहे. इतक्या मोठ्या रकमेची चांदी पाहून पोलिसांना धक्का बसला. ही चांदी जप्त करण्यात आली.

मानखुर्द पोलिस वाशी चेकनाक्यावर वाहनांची तपासणी करत आहेत. या तपासणीदरम्यान शुक्रवारी रात्री एका वाहनाची तपासणी करण्यात आली. या मोठ्या ट्रकमध्ये पोलिसांना चांदी मिळाली. मोठ्या प्रमाणावर चांदी पाहून पोलिसांना धक्का बसला. या चांदीचे वजन करण्यात आले. ती ८,४७६ किलोग्रॅम भरली. त्या चांदीची बाजारातील किंमत ८० कोटी रुपये आहे. अधिका-यांनी चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आयकर विभाग आणि निवडणूक आयोगाच्या टीमला घटनास्थळी बोलावले. आता आयकर विभागाचे अधिकारी या चांदीच्या मालकाचा शोध घेत आहेत. सुरुवातीच्या चौकशीत ही चांदी बेकायदेशीरपणे घेऊन जात असल्याचे समोर आले आहे.

नागपूरमध्येही कारवाई
नागपूर गुन्हे शाखा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सोने-चांदी, डायमंडचे दागिने आणि इतर साहित्य असा जवळपास १ कोटी ६३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुंबईवरून नागपूरला पार्सल आले होते. या प्रकरणी २ आरोपींना अटक करण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR