18.1 C
Latur
Monday, January 6, 2025
Homeमहाराष्ट्रबडगुजर प्रकरणी एसआयटी चौकशी होणार : गृहमंत्री

बडगुजर प्रकरणी एसआयटी चौकशी होणार : गृहमंत्री

नागपूर : मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहीम याचा उजवा हात समजला जाणाऱ्या सलीम कुत्तासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्याने पार्टी केल्याचा आरोप शुक्रवारी विधानसभेत करण्यात आला. सलिम कुत्ता याच्यासोबत शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिकमधील महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा मुद्दा आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत उपस्थित केला. यासंदर्भातील फोटो दाखवत त्यांनी गंभीर आरोप केले. आता या आरोपाप्रकरणी एसआयटी चौकशी होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी तपासाची घोषणा केली.

सुधाकर बडगुजर याला कोणाचा वरदहस्त आहे, त्याला हिंदुत्ववादी असणाऱ्या पक्षाकडून कसे संरक्षण दिले जात आहे, शिवसेना भवन बॉम्बस्फोटाने उडवण्याचा कट करणाऱ्यांना संरक्षण देणाऱ्यांनाही समोर आणावे, अशी मागणी नितेश राणे यांनी सभागृहात केली. या प्रकरणात एसआयटी चौकशीची घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत पार्टी केल्याच्या विधानसभेत गृहमंत्री देशद्रोह्यांसोबत पार्ट्या झोडल्याचा आरोप नितेश राणे यांनी सभागृहात केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR