22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeराष्ट्रीयएसआयटी करणार स्वाती मालीवाल प्रकरणाचा तपास

एसआयटी करणार स्वाती मालीवाल प्रकरणाचा तपास

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक मोठी माहिती समोर आली आहे. या हल्ल्याच्या तपासासाठी आता दिल्ली पोलिसांचे विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. तत्पूर्वी सोमवारी संध्याकाळी दिल्ली पोलिसांचे पथक बिभव कुमार यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. यावेळी उत्तर जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस उपायुक्त अंजिता चिपियाना यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पोलिस अधिका-याने सांगितले की, स्वाती मालीवाल प्रकरणात विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आली आहे. आठवड्याभरापूर्वी आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांनी मारहाण केली होती. यानंतर बिभवला अटक करण्यात आली असून, पोलिसांनी केजरीवाल यांच्या निवासस्थानामधून सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणावरून भाजपने ‘आप’वर जोरदार निशाणा साधला आहे. तर ‘आप’ने स्वाती यांचे सर्व आरोप फेटाळले असून, स्वाती भाजपच्या षडयंत्राअंतर्गत आरोप करत असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास आता एसआटी करणार असून, या एसआयटी टीमचे नेतृत्व उत्तर जिल्ह्यातील अतिरिक्त डीसीपी अंजिता चिपियाना करणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR