22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात घरांमध्ये गाळ, चिखल

पुण्यात घरांमध्ये गाळ, चिखल

मुख्यमंत्री शिंदेंचे यंत्रणेला महत्त्वपूर्ण आदेश

पुणे : प्रतिनिधी
पुणे शहरासह आसपासच्या भागात काल झालेल्या अतिवृष्टीमुळे सिंहगड रोड, संचायनी पुलाजवळील पाटील इस्टेट, एकता नगर, फुलपची वाडी आदी भागातील घरांमध्ये पाणी शिरल्याने चिखल आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या घरांमधील चिखल, गाळ आणि कच-याची महापालिका तसेच साफसफाई करणा-या खासगी कंपन्यांच्या मदतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

पुरामुळे घरांच्या, शेतीच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिका-यांना केल्या आहेत. पुण्यातील सिंहगड रोड, संचयनी पुलाजवळील पाटील इस्टेट, एकता नगर, फुलपची वाडी आदी भागातील घरांमध्ये चिखल आहे. त्यामुळे या भागातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून त्याची त्वरित दखल मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली असून जिल्हा प्रशासनाला डीप क्लीन मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

घरांमध्ये शिरलेल्या पुराच्या पाण्यामुळे झालेला चिखल साफ करण्यासाठी सुमित एंटरप्राईजेस आणि बीव्हीजी या खासगी स्वच्छता कंपन्यांची मदत घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाची दखल घेऊन सुमित कंपनी ५०० स्वच्छता कर्मचारी आणि बीव्हीजी कंपनी १०० सफाई कर्मचारी उपलब्ध करून देणार असून त्यांच्या माध्यमातून घरांमधील चिखल काढून साफसफाई करण्यात यावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR