28.3 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रजळगावमधून भाजपच्या स्मिता वाघ विजयी

जळगावमधून भाजपच्या स्मिता वाघ विजयी

ठाकरे गटाच्या करण पवारांचा दारूण पराभव

जळगाव : जळगाव लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं होतं. या मतदारसंघात भाजपने आपला गड राखला असून महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ या विजयी झाल्या आहे. महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे करण पवार यांना उमेदवारी दिली होती. दरम्यान मागील २० वर्षांपासून जळगावात भाजपचा खासदार आहे, त्यामुळे यंदा येथे काही चमत्कार होणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर या मतदारसंघात भाजपने आपला गड राखला असून महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ या दीड लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आलेल्या असून शहरातील भाजप कार्यालयात महिला कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून एकच जल्लोष केला आहे.

भाजपचा बालेकिल्ला म्हणून जळगाव लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे. या मतदारसंघातून भाजपच्या स्मिता वाघ या महायुतीच्या उमेदवार आहेत. तर महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने करण पवार यांना उमेदवारी दिली आहे. मागील 20 वर्षांपासून जळगावात भाजपचाच खासदार आहे. यंदा जळगाव लोकसभा मतदारसंघात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. जळगाव लोकसभेसाठी यंदा एकूण 57.70 टक्के मतदान झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR