मुंबई : भारताची स्टार बॅटर स्मृती मानधना हिने वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिस-या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात धमाकेदार खेळीसह एका डावात अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. २८ वर्षीय डावखु-या बॅटरनं भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करताना १३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४७ चेंडूत ७७ धावांची खेळी केली. तिने जेमिमा रॉड्रिग्ज (३९) च्या साथीने दुस-या विकेटसाठी ९८ धावांची दमदार भागीदारी रचली. त्यानंतर तिने रघवी बिस्ट (३१) च्या साथीने तिस-या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी केली.
त्यामुळे तिस-या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात भारतीय महिला संघाने निर्धारित २० षटकात ४ विकेट्सच्या मोबदल्यात २०१७ धावा केल्या. धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज महिला निर्धारित २० षटकांत ९ विकेट्सच्या मोबदल्यात फक्त १५९ धावांपर्यंतच मजल मारू शकला. भारतीय महिला संघाने हा सामना ६० धावांनी जिंकत मालिका २-१ अशी आपल्या नावे केली. वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्या टीम इंडियाचे नेतृत्व करताना ७७ धावांच्या खेळीसह स्मृती मानधना हिने माजी कर्णधार मिताली राजचा विक्रम मोडीत काढला. टी-२० द्विपक्षीय मालिकेत सर्वाधिक धावांचा विक्रम आता स्मृती मानधनाच्या नावे झाला आहे. मितालीने फेब्रुवारी २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या ळ20क मालिकेत भारतासाठी १९२ धावा केल्या होत्या. स्मृती मानधनानं वेस्ट इंडिज विरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत हा विक्रम मागे टाकला. या मालिकेत तिने १९३ धावा केल्या.
वर्ल्ड रेकॉर्डही झाला नावे
वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिन्ही सामन्यात स्मृती मानधनाच्या भात्यातून ५० पेक्षा अधिक धावांची खेळी आल्याचे पाहायला मिळाले. या कामगिरीसह तिने महिला टी २० मध्ये सर्वाधिक ५०+ धावा करणा-या न्यूझीलंडच्या सुझी बेट्सचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडीत काढला. आता हा विश्वविक्रमही स्मृती मानधनाच्या नावे झाला आहे.