37.7 C
Latur
Saturday, May 18, 2024
Homeराष्ट्रीयआतापर्यंत २ हजार रुपयांच्या ९७ टक्के नोटा बँकांकडे परत

आतापर्यंत २ हजार रुपयांच्या ९७ टक्के नोटा बँकांकडे परत

नवी दिल्ली : चलनातून बाद करण्यात आलेल्या २ हजार रुपयांच्या नोटांपैकी ९७ टक्क्यांहून अधिक नोटा बँकिंग व्यवस्थेत परत आल्या आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बुधवारी ही माहिती दिली. या वर्षी १९ मे रोजी रिझर्व्ह बँकेने २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. लोकांना या नोटा बँकांमध्ये जमा करण्याची आणि इतर मूल्यांच्या नोटांसह बदलण्याची सुविधा देण्यात आली होती.

रिझव्‍‌र्ह बँकेने एका अधिसूचनेत म्हटले आहे की, १९ मे २०२३ रोजी चलनात असलेल्या २,००० रुपयांच्या नोटांचे एकूण मूल्य ३.५६ लाख कोटी रुपये होते. आता ते ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी १०,००० कोटी रुपयांवर आले आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारे, १९ मे २०२३ पर्यंत चलनात असलेल्या २,००० रुपयांच्या एकूण नोटांपैकी ९७ टक्क्यांहून अधिक नोट आता परत आल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR