नवी दिल्ली : काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची फेरनिवड करण्यात आली असून शनिवारी ८ जून रोजी सायंकाळी लोकसभा आणि राज्यसभेच्या दोन्ही पक्षांच्या खासदारांच्या बैठकीत त्यांची पुन्हा नेतेपदी निवड करण्यात आली आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोनिया गांधी यांची संसदीय पक्षाच्या प्रमुखपदी निवड करण्याचा प्रस्ताव मांडला. याला सर्व खासदारांनी एकमताने मंजुरी दिली. या आधी काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेते पदाचा ठराव मंजूर केला. वीरप्पा मोईली म्हणाले आम्हाला ब-याच गोष्टींवर चर्चा करण्याची गरज आहे.
ज्या प्रकारे काँग्रेस आणि इंडियाखूप जास्त मतांची टक्केवारी आणि जागा मिळाल्या. अर्थात, आम्ही जिंकून सत्तेत यायला हवे होते. राहुल गांधी या देशाचे पंतप्रधान व्हायला हवे होते, पण आता नरेंद्र मोदी इतके महान नाहीत, ते मताच्या बाबतीत पूर्णपणे खाली पडले आहेत आणि आज नाही तर उद्या काँग्रेसची सत्ता येईलच असेही मोईली म्हणाले.