22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeक्रीडादक्षिण आफ्रिकेचा महिला क्रिकेट संघ भारत दौ-यावर येणार

दक्षिण आफ्रिकेचा महिला क्रिकेट संघ भारत दौ-यावर येणार

बंगळूरू : भारत दौ-यावर दक्षिण आफ्रिकेचा महिला क्रिकेट संघ जून २०२४ मध्ये येणार आहे. या दौ-यात भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघांमध्ये तीन वनडे, एक कसोटी आणि तीन टी२० सामने खेळवण्यात येणार आहेत.

या दौ-याला १३ जूनपासून सुरुवात होणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा हा दौरा ९ जुलै रोजी संपेल. १३ जूनला बेंगळुरूमध्ये दक्षिण आफ्रिका संघ सराव सामना खेळेल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आधी १६ जूनपासून वनडे मालिका होईल, तर नंतर एकमेव कसोटी सामना खेळवला जाईल आणि शेवटी टी २० मालिका होईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR