22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रसोयाबीनचे दर घसरले

सोयाबीनचे दर घसरले

हमीभावापेक्षा कमीने विक्री; शेतकरी संकटात

पुणे : सोयाबीनचे दर घसरले आहेत. हमीभावापेक्षा दोनशे रुपये कमीने सोयाबीनची विक्री सुरु आहे. सरकारचे धोरण आणि जागतिक बाजारपेठेचा सोयाबीनच्या दरावर परिणाम दिसून येत आहे. मराठवाडा विभागात ४८ लाख हेक्टर वर विदर्भ ५५ लाख हेक्टरवर तर उर्वरित राज्यात ५० लाख हेक्टरवर सोयाबीनचे लागवड क्षेत्र आहे. यावर उपजीविका करणा-या लाखो शेतक-यांच्या अर्थकारणावर परिणाम होताना दिसतो.

केंद्र सरकारची खाद्यतेल आयातीचे धोरण, त्यातच जागतिक पातळीवर सोयाबीनचे भरघोस उत्पादन, याचा थेट परिणाम राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतक-यांना भोगावा लागत आहे. हमीभावापेक्षा सोयाबीनचे दर खाली गेल्याने शेतकरी व्यापारी आणि उद्योजकासमोर आता प्रश्न निर्माण झाला आहे. येणा-या काळातही सोयाबीनचे दर वाढण्याची चिन्हे दिसत नाहीत.

राज्यातील अल्पभूधारक शेतकरी आणि कोरडवाहू शेतक-यांचे मुख्य पीक सोयाबीन वरच सर्व भिस्त असते. ज्यावेळेस पैशाची गरज असेल, त्यावेळी सोयाबीन बाजारात घेऊन येण्याची वृत्ती शेतक-यांमध्ये असते. मात्र, रविवारी सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी भाव मिळाला. बाजारपेठेत तब्बल तीन वर्षानंतर ही स्थिती आलेली पाहायला मिळत आहे. ४६०० रुपयेच खाली भाव गेले होते. लातूर बाजारपेठेत रविवारी आठ ते नऊ हजार क्विंटल सोयाबीन आवक झाली होती. सोमवारीही आठ ते नऊ हजार क्विंटल सोयाबीनचे आवक झाली आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR