मुंबई : गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणा-या चाकरमान्यांसाठी कोकण आणि मध्य रेल्वेकडून २०२ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. चाकरमान्यांना उद्यापासून ऑनलाईन बुकिंग सुविधा सुरु होणार आहे. १ ते १८ सप्टेंबरदरम्यान या गणपती विशेष गाड्या धावणार आहेत.
मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात कोकणातील लोक राहतात. त्यांना आपल्या मुळगावी जाण्यासाठी नियमित रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण केले आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात नियमित रेल्वेगाड्यांचे आरक्षण क्षमतेपेक्षा अधिक झाले आहे. यामुळे अनेक प्रवाशांना रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण मिळाले नाही, या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वेगाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवाला ७ सप्टेंबर पासून सुरूवात होत आहे.