मुंबई : वृत्तसंस्था
एखाद्याने स्पर्म किंवा एग डोनेट केले असेल तर तो त्या मुलांवर कोणताही कायदेशीर दावा करू शकत नाही, तसेच बायोलॉजिकल पालक असल्याचा कोणताही दावा करू शकत नाही, असा महत्त्वाचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला. या प्रकरणातील ४२ वर्षांच्या महिलेला तिच्या पाच वर्षांच्या जुळ््या मुलींना भेटण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली.
या प्रकरणात ज्या महिलेने याचिका केली, तिचा पती जुळ््या मुलींना घेऊन वेगळे राहत आहे. त्या महिलेच्या पतीसोबत त्या महिलेची लहान बहीण म्हणजे पतीची मेहुणी राहते. त्या मेहुणीनेच एग डोनेट केल्याने जुळ््या मुलींचा जन्म झाला. मेहुणीनेच एग डोनेट केल्याने जुळ््या मुलींचा जन्म झाला असून तिचा या मुलांवर बॉयोलॉजिकल पालक म्हणून दावा आहे. तसेच आपल्या पत्नीचा या मुलांवर कोणताही अधिकार नाही, असे तिच्या पतीने म्हटले होते.
एग डोनेट केलं म्हणून मुलांवर दावा नाही
या प्रकरणावर न्यायमूर्ती मिंिलद जाधव यांच्या एकल बेंचसमोर सुनावणी झाली. निकाल देताना न्यायमूर्तींनी सांगितलं की, जरी याचिकाकर्त्या महिलेच्या लहान बहिणीने एग डोनेट केलं असलं तरी तिचा जुळ्या मुलींवर कोणताही कायदेशीर अधिकार नाही,किंवा ती बायोलॉजिकल पालक असल्याचा दावा करू शकत नाही.