पुर्णा : अॅक्शन अॅन्ड, मानवी हक्क अभियान व सावित्रीमाई एकल महिला संघटनेच्या वतीने एकल महिला चेतक कार्यकर्ती यांचे एकदिवसीय प्रशिक्षण दि. ११ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरास उद्घाटक म्हणून भावनाताई नखाते होत्या. प्रशिक्षक म्हणून लातूर येथील सुवर्णा गायकवाड होत्या. या शिबिराचे अध्यक्ष म्हणून पाथरी येथील समाजसेवक तथा उद्योजक सहेजाद लाला होते. प्रमुख पाहुणे म्हणून मानवी हक्क अभियानचे पाथरी अध्यक्ष डॉ. भीमाशंकर वैराळे, सावित्रीमाई एकल महिला संघटनेच्या तालुका अध्यक्षा उषा यादव होत्या.
या वेळी भावना नखाते म्हणाल्या की महिलांनी उद्योग व्यवसायाकडे वळत आपल्या मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देऊन त्यांचे शिक्षण गुणवत्ता पूर्वक कसे होईल याकडे जास्तीचे लक्ष देवून आपण संघटित होवून मी एक महिला म्हणून तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबध्द आहे. दुपारच्या सत्रामध्ये कॉ. अंगद भोरे यांनी शासकीय योजनांची सखोल अशी माहिती देवून महिलांनी संघटित होवून आपल्यावरील अन्याय अत्याचाराला विरोध केला पाहिजे असे सांगितले. प्रास्ताविक सावित्रीमाई एकल महिला संघटनेचे प्रमुख रघुनाथ कसबे यांनी तर आभार उषा यादव यांनी मानले.