22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeअंतरराष्ट्रीयश्रीलंकेत राष्ट्रपती निवडणुकीच्या तारखा जाहीर, १५ ऑगस्टपासून स्वीकारले जाणार अर्ज

श्रीलंकेत राष्ट्रपती निवडणुकीच्या तारखा जाहीर, १५ ऑगस्टपासून स्वीकारले जाणार अर्ज

कोलंबो : निवडणूक आयोगाने श्रीलंकेत यावर्षी २१ सप्टेंबर रोजी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे विद्यमान राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांचा कार्यकाळ वाढवण्यासाठी निवडणुका पुढे ढकलल्या जातील या चर्चेला पूर्णविराम लागला आहे. आज निवडणूक आयोगाने शासकीय राजपत्र क्रमांक २३९४/५१ जारी करून घटनेच्या कलम ३१(३) नुसार राष्ट्रपतिपदाची निवडणूक २१ सप्टेंबरला होणार असून, १५ ऑगस्टला अर्ज स्वीकारले जातील, असे सांगण्यात आले आहे.

निवडणुकीच्या या घोषणेमुळे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांचा उर्वरित कार्यकाळ संपणार आहे. २०२२ मध्ये गोटाबाया राजपक्षे यांनी राष्ट्रपतिपदाचा राजीनामा दिला होता. २०१९ मध्ये राष्ट्रपतिपदाच्या निवडणुका झाल्या, तेव्हा राजपक्षे ७० लाखांच्या विक्रमी मतांनी राष्ट्रपती झाले. मात्र २०२२ च्या सुरुवातीस हजारो लोकांनी राजपक्षे यांना आर्थिक संकटाचा सामना करण्यात अपयशी ठरल्याबद्दल राष्ट्रपतिपद सोडण्याची मागणी केली होती.

राजपक्षे यांनी ९ जुलै २०२२ रोजी देश सोडला

दरम्यान, राजपक्षे यांना ९ जुलै २०२२ रोजी देश सोडून पळून जावे लागले होते, त्यानंतर राजपक्षे यांचे उत्तराधिकारी म्हणून संसदेद्वारे रानिल विक्रमसिंघे यांची निवड करण्यात आली होती. विक्रमसिंघे यांनी आयएमएफच्या बेलआऊट सुविधेचा फायदा घेऊन देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या काळात भारतानेही श्रीलंकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत केली. भारताने २०२२ च्या पहिल्या तिमाहीत श्रीलंकेला ४ अब्जची अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR