22.8 C
Latur
Thursday, February 22, 2024
Homeमहाराष्ट्रमोदी, शाह यांचे राज्य दौरे वाढले

मोदी, शाह यांचे राज्य दौरे वाढले

नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे महाराष्ट्रामधील दौरे अचानक वाढले आहेत. या नव्या वर्षांत पंतप्रधान मोदी यांनी दोन वेळा महाराष्ट्र दौरा केल्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचासुद्धा विदर्भामध्ये दौरा निश्चित करण्यात आला आहे. अमित शाह १५ फेब्रुवारी रोजी अकोला दौ-यावर येणार असल्याची माहिती आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांचा हा दौरा असेल.दरम्यान, पश्चिम विदर्भामध्ये लोकसभा मतदारसंघांमध्ये अमित शाह कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी ते संवाद साधतील. हा दौरा निश्चित होत असतानाच १९ फेब्रुवारी रोजी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौ-यावर येणार आहेत. या दौ-यात त्यांच्याकडून कोस्टल रोडचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

तत्पूर्वी, त्यांनी अटल सागरी सेतूचे उद्घाटन करण्यासाठी महाराष्ट्र दौरा केला होता. राम मंदिर सोहळ््यापूर्वी त्यांनी नाशिकला काळाराम मंदिरामध्ये भेट दिली होती. हा सर्व घटनाक्रम पाहता भाजपकडून आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौरे आयोजित केले जात आहेत. राज्यामध्ये महायुती सरकार असले तरी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पूरक वातावरण नसल्याने भाजपच्या नेतृत्वाकडून अमित शाह आणि मोदींचा दौ-यांवर दौरे आयोजित केले जात आहेत का, अशीही चर्चा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR