22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रपंतप्रधानविरोधात वक्तव्य; पत्रकार वागळेविरुद्ध गुन्हा दाखल

पंतप्रधानविरोधात वक्तव्य; पत्रकार वागळेविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : भारतरत्न व भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह व अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी पत्रकार निखिल वागळे यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत भाजपचे नेते सुनिल देवधर (वय ५८, रा. नारायण पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती दौपदी मुर्मु यांनी माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न दिल्याबद्दल सोशल मीडियावर संदेश देऊन अभिनंदन केले होते. त्यावर ट्विट करताना पत्रकार निखिल वागळे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे अडवाणी यांना मानणा-या असंख्य कार्यकर्त्यांच्या भावना दुखावून समाजात एकोपा राहण्यास बाधा निर्माण केली. तसेच सार्वजनिक शांतता धोक्यात आणणारी पोस्ट जाणिवपूर्वक प्रसारित करुन त्यांची जनमानसातील प्रतिमा मलिन करण्याकरीता बदनामी करुन अवहेलना केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ते पुढील कारवाई करतील, अशी आशा आहे. चिथावळीखोर वागळे यांच्या सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी सुनिल देवधर यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR