18.9 C
Latur
Saturday, January 4, 2025
Homeमहाराष्ट्रजळगावात मंत्री गुलाबराव पाटलांच्या कुटुंबीयांच्या गाडीवर दगडफेक

जळगावात मंत्री गुलाबराव पाटलांच्या कुटुंबीयांच्या गाडीवर दगडफेक

जळगाव : प्रतिनिधी
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांचे कुटुंबीय प्रवास करत असलेल्या गाडीवर दगडफेक झाल्याची माहिती समोर येत आहे. जळगाव जिल्ह्याच्या पाळधी गावात मंगळवार, ३१ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. वाहनचालकाने गाडीचा हॉर्न वाजवल्याने आणि गाडी टच झाल्याने हा वाद झाला.

दरम्यान, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांचे कुटुंबीय प्रवास करत असलेल्या गाडीवर दगडफेक झाल्याची माहिती समोर येत आहे. जळगाव जिल्ह्याच्या पाळधी गावात मंगळवार, ३१ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. वाहनचालकाने गाडीचा हॉर्न वाजवल्याने आणि गाडी टच झाल्याने हा वाद झाला.

काही वेळाने या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले आणि पाळधी गावचे काही तरुण आणि शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी राडा घातला. विशेष म्हणजे हा राडा इतका भयंकर होता की, त्यात १० ते १२ दुकानं पेटवण्यात आली. परिणामी, पाळदी गावात पोलिसांकडून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

मंत्री गुलाबराव पाटील यांचे कुटुंबीय जळगावातील पाळधी गावातून कारने प्रवास करत होते. त्यावेळी रस्त्यात काही जण उभे असल्याने वाहनचालकाने हॉर्न वाजवला. त्यावेळी उपस्थित काही जणांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाहनात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नी असल्याने शिवीगाळ करणा-या तरुणांवर काही शिवसैनिक धावून गेले. यानंतर दोन गट आमने-सामने आले आणि त्यातूनच ही दगडफेक व जाळपोळीची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR