28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयलोकांना मूर्ख बनवणे बंद करा

लोकांना मूर्ख बनवणे बंद करा

मल्लिकार्जुन खरगेंचा पीएम मोदींवर घणाघात

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक जवळ आली आहे, त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक सातत्याने एकमेकांवर टीका करत आहेत. यातच आता, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली. भाजप देशातील संविधान नष्ट करण्याचे काम करत आहे. एकीकडे पीएम मोदी संविधान सुरक्षित असल्याचे सांगतात, तर दुसरीकडे त्यांचे खासदार संविधान बदलण्याची भाषा करतात अशी टीका खरगे यांनी केली.

माध्यमांशी संवाद साधताना मल्लिकार्जुन खरगे म्हणतात, पंतप्रधान मोदींमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी अशी वक्तव्ये करणा-या नेत्यांनी पक्षातून बाहेर काढावे. भाजप नेहमीच सामाजिक न्यायाच्या आणि धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात आहे. आरएसएस आणि मोहन भागवत देशातून आरक्षण आणि संविधान संपवण्याचे काम करत आहेत. आजही आरएसएस भगव्या झेंड्यासमोर भारताच्या तिरंग्याला फारसे महत्त्व देत नाही. मोदीजी देशाचे संविधान बदलण्यासाठी ४०० पारचा नारा देत आहात का?’ असा सवालही त्यांनी यावेळी केला.

तर देशात गदारोळ
कोणी संविधान बदलण्याचा प्रयत्न केला तर देशात मोठा गदारोळ होईल. अशा प्रयत्नांचा आम्ही निषेध करतो. पंतप्रधान आजकाल हिंदी सोडून प्रादेशिक भाषेत बोलून लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपने देशाची राज्यघटना पूर्णपणे स्वीकारली नाही, हे खेदजनक आहे. एलेक्टोरल बाँड्सप्रकरणात एसबीआयने सर्वोच्च न्यायालयाकडे वेळ मागितला, यावरुन हे स्पष्ट होते की, मोदी सरकार आपली काळी कृत्ये लपवण्याचा प्रयत्न करत आहे. एवढा वेळ कशाला हवाय? सरकारला निवडणुकीपर्यंत सत्य लपवायचे आहे अशी टीकाही त्यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR