27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमनोरंजनबॉक्स ऑफिसवर ‘स्त्री २’चे राज्य; केली छप्पर फाड कमाई!

बॉक्स ऑफिसवर ‘स्त्री २’चे राज्य; केली छप्पर फाड कमाई!

मुंबई : वृत्तसंस्था
‘स्त्री २ ’ अभिनेत्री श्रध्दा कपूर आणि अभिनेता राजकुमार राव स्टारर चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. हॉरर कॉमेडी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातलाय. १५ ऑगस्टला रिलिज झालेला हा सिनेमा पहिल्याच दिवसापासून बक्कळ कमाई करताना दिसला.

‘स्त्री २’ रिलीज होऊन दहा दिवस झाले. दहाव्या दिवशीही चित्रपटाची जादू कायम आहे. प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी खूप उत्साह पहायला मिळत आहे. दमदार कलेक्शनसह चित्रपटाने भारतात ३६१ कोटींचा टप्पा ओलांडला आहे. ‘स्त्री २’ १० व्या दिवसाच्या कलेक्शनसह ३५० कोटी क्लबमध्ये सहभागी झालाय. चित्रपट दररोज नवे रेकॉर्ड करताना दिसत आहे. त्यामुळे चित्रपट आता लवकरच ५०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल असा अंदा वर्तवला जात आहे.

३५९ कोटी या मजबूत कलेक्शनसह ‘स्त्री २’ ने बॉलिवूडपासून साऊथच्या अनेक हिट आणि सुपरहिट चित्रपटांना मागे सोडलं आहे. बॉक्स ऑफिसवर ‘स्त्री २’ जलवा कायम असून छप्पर पाड कमाई सुरु आहे. कलाकारांच्या अभिनयापासून हॉरर कॉमेडी ट्विस्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

दरम्यान, श्रद्धा कपूर, राजकुमार राव पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यासह अनेक कलाकारांनी‘स्त्री २’ मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. अक्षय कुमार आणि तमन्ना भाटिया यांनी चित्रपटात कॅमिओ केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR