25.3 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा समाजाकडून बीडमध्ये कडकडीत बंद

मराठा समाजाकडून बीडमध्ये कडकडीत बंद

बीड प्रतिनिधी : मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असून त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत आहे. यामुळे सकल मराठा समाजाच्या वतीने ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली आहे.
सोलापूर, मनमाड, लातूर, नांदगाव, बीड, येवला येथे बंद पाळण्यात येत आहे. या ‘बंद’ला बीड जिल्ह्यातील सर्व व्यापा-यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली. तर परळी येथे सकल मराठा बांधवांनी बाईक रॅली काढत जोरदार घोषणा दिल्या तसेच निदर्शने करत ‘महाराष्ट्र बंद’ला पाठिंबा दिला.

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र व सगेसोयरेचा कायदा लागू करावा यासाठी जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू आहे. जरांगे पाटलांची प्रकृती खालावल्याने समाजाच्या वतीने ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली. या ‘बंद’ला बीडमध्येही उत्स्फूर्त प्रतिसाद देण्यात येत आहे.
जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी १३ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते २७ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यात संचार बंदीचे आदेश लागू केले आहेत. तसेच या आदेशांचे पालन नागरिकांनी करावे असे आवाहन देखील या आदेशातून करण्यात आले आहे.

जिल्ह्यात पोलिस बंदोबस्त तैनात
बीड जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. सध्या बीड जिल्ह्यात सर्वत्र शांततेत बंद पाळण्यात येत असून अद्याप कोणताही अनुचित प्रकार झाल्याचे वृत्त समोर आले नाही.

बारामतीत बंद
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने सकल मराठा समाजाकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर बारामतीत व्यापा-यांनी या ‘बंद’ला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत शंभर टक्के दुकाने बंद ठेवली आहेत. दुपारी बारा वाजेपर्यंत हा बंद पाळण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR