17.3 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeराष्ट्रीयस्ट्रायकर टँकचा करार भारतासाठी गेम चेंजर!

स्ट्रायकर टँकचा करार भारतासाठी गेम चेंजर!

भारत-अमेरिकेत करार?, चीनला लागून असलेल्या सीमेजवळ मोठी ताकद मिळण्यास होणार मदत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारत-अमेरिकेमध्ये एका डील संदर्भात बोलणी सुरू आहे. स्ट्रायकर टँक संदर्भातील हा करार आहे. हा करार निश्चित झाल्यास चीनला लागून असलेल्या सीमेजवळ भारताला मोठी ताकद मिळेल. कारण या स्ट्रायकर टँकचा समावेश सैन्यदलात झाल्यास ते भारतीय सैन्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. दोन्ही देशांत स्ट्रायकर आर्मर्ड फायटिंग व्हेईकलच्या उत्पादनासंदर्भात चर्चा अंतिम टप्प्यात आहे. या करारानंतर आर्मर्ड व्हेईकलचे उत्पादन भारतात होऊ शकणार आहे.

अमेरिकेने भारताकडे ८ चाकी स्ट्रायकरचा वेग आणि मारक क्षमतेचे प्रदर्शन करण्याचा प्रस्तावही दिला आहे. त्यादृष्टीनेही हालचाली सुरू झाल्या आहेत. भारत अमेरिकेकडून १५० स्ट्रायकर टँक विकत घेऊ शकतो. आज भारत मेक इन इंडियाच्या धर्तीवर नव्या शस्त्रास्त्र निर्मितीवर काम करत आहे. स्ट्रायकर संदर्भात भारत-अमेरिकेत डील फायनल झाली तर भारत फक्त सहउत्पादनच करणार नाही तर अमेरिका याची टेक्नॉलॉजीही ट्रान्सफर करेल. या डीलसाठी भारताचे १३ वेंडर शर्यतीत आहेत. करार अंतिम झाल्यानंतर भारतीय प्रदेशाला अनुकूल ठरणारी टेक्नॉलॉजी त्यामध्ये आणावी लागेल.

यात लडाख आणि सिक्कीमसारख्या उंच प्रदेशातही हे टँक सहजतेने हाताळता आले पाहिजेत. चीनला लागून असणा-या सीमेजवळ भारताला अशा टँकची आवश्यकता आहे. उंच डोंगराळ भागातही हे टँक उपयुक्त ठरले पाहिजेत. हीच उपयुक्तता पटवून देण्यासाठी अमेरिकेने भारताकडे स्ट्रायकरची गती आणि मारक क्षमता याचे प्रदर्शन करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

स्वदेशीकरणाचा प्रयत्न
आधी अमेरिकेकडून हे टँक विकत घ्यायचे. नंतर भारतात संयुक्त उत्पादन करायचे व भविष्यातील वर्जन विकसित करायचे, असा कार्यक्रम आहे. स्ट्रायकरचे मोठ्या प्रमाणात स्वदेशीकरण करण्याचा प्रयत्न असेल. टेक्नॉलॉजी ट्रान्सफर यामध्ये आहे. संरक्षण क्षेत्रातील सरकारी आणि खासगी कंपन्या यामध्ये भागीदार असतील, असे सांगण्यात येत आहे.

स्ट्रायकरची वैशिष्ट्ये
-स्ट्रायकर ८ चाकी वाहन आहे. जनरल डायनेमिक्स लँड सिस्टम्स कॅनडा आणि संयुक्त राज्य अमेरिकेच्या जनरल डायनेमिक्स लँड सिस्टम्स डिव्हिजन यांनी मिळून विकसित केले आहे.
-टेक्निकी स्तरावर स्ट्रायकर सैन्यातील एक चिलखती वाहन आहे.
-या वाहनात ३० मिमी तोफ आणि १०५ मिमी मोबाइल गन असते
-स्ट्रायकरमध्ये ९ सैनिक बसू शकतात
-यात ३५० हॉर्सपॉवरचे कॅटरपिलर सी-७ इंजिन आहे.
-स्ट्रायकरची रेंज ४८३ किलोमीटर आहे.
-स्ट्रायकर १०० किमी प्रतितास वेगाने पोहोचू शकते.
-स्ट्रायकरमध्ये अन्य हलक्या सैन्य वाहनाच्या तुलनेत आयईडीपासून वाचण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR