27.5 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeराष्ट्रीयमुलीची अंतर्वस्त्र काढून स्वत: नग्न होणे हा बलात्काराचा प्रयत्न नाही

मुलीची अंतर्वस्त्र काढून स्वत: नग्न होणे हा बलात्काराचा प्रयत्न नाही

जयपूर : अल्पवयीन मुलीची अंतर्वस्त्रे काढून स्वत: नग्न होणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही असे राजस्थान उच्च न्यायालयाने म्हटले आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने हा महत्त्वाचा निर्णय देताना, अल्पवयीन मुलीची अंतर्वस्त्रे काढणे आणि स्वत: नग्न होणे या कृतीला वेगळा गुन्हा ठरवले आहे. न्यायमूर्ती अनूप कुमार धांड म्हणाले की, हा बलात्काराच्या प्रयत्नाचा गुन्हा नाही.अल्पवयीन मुलीची अंतर्वस्त्रे काढणे हा बलात्काराचा प्रयत्न मानता येणार नाही. त्याऐवजी, भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ अन्वये हा महिलेचा अपमान आहे आणि कलम ३७६/५११ अंतर्गत बलात्काराचा प्रयत्न नाही.

अल्पवयीन मुलीची अंतर्वस्त्रे काढून स्वत: नग्न होणे हा बलात्काराचा प्रयत्न नाही, असा निर्णय राजस्थान उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने एका ३३ वर्ष जुन्या प्रकरणात न्यायालयाने हा मोठा निर्णय दिला आहे. अल्पवयीन मुलीची अंतर्वस्त्रे काढणे, हा बलात्काराचा प्रयत्न मानता येणार नाही, असं राजस्थान उच्च न्यायालयाने म्हटले आहे. ही कृती भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६/५११ अंतर्गत बलात्काराचा प्रयत्न नसून, कलम ३५४ अन्वये हा स्त्रीच्या प्रतिष्ठेविरुद्ध गुन्हा आहे असेही न्यायालयाने म्हटले आहे.

हा स्त्रीच्या प्रतिष्ठेविरुद्ध गुन्हा
मुलीची अंतर्वस्त्रे काढून पूर्णपणे नग्न होणे हा आयपीसीच्या कलम ३७६ आणि कलम ५११ नुसार गुन्हा नाही, असे राजस्थान उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायमूर्ती अनुप कुमार धांड यांनी म्हटले आहे की, हा बलात्काराच्या प्रयत्नाचा गुन्हा नाही. बलात्काराचा प्रयत्न म्हणजे आरोपीने तयारीनंतर पाऊल उचलणे. मुलीची अंतर्वस्त्रे काढणे आणि स्वत: नग्न होणे, स्त्रीच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारी ही बाब असून आयपीसीच्या कलम ३५४ अंतर्गत दंडनीय असेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.

नेमके प्रकरण काय?
तक्रारीनुसार, मुलगी एका वॉटर बूथवर पाणी पीत होती तेव्हा आरोपी तिच्यावर बलात्कार करण्याच्या उद्देशाने तिला जबरदस्तीने जवळच्या धर्मशाळेत घेऊन गेला. यावेळी आरोपीने स्वत:चे आणि पीडितेचे कपडे काढले. मात्र, मुलीने आरडाओरड करताच गावक-यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तिची सुटका केली. यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. हे प्रकरण ११ वर्षांपूर्वीचे असून आरोपी त्यावेळी २५ वर्षांचा होता आणि पीडिता ६ वर्षांची होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR