23.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रस्ट्राँग रूमचे डिस्प्ले चार मिनिटांसाठी बंद

स्ट्राँग रूमचे डिस्प्ले चार मिनिटांसाठी बंद

जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या सहा टप्प्यांतील मतदान पार पडले असून राज्यातील सर्वच मतदारसंघातील मतदान देखील झाले आहे. सर्वांचे भविष्य ईव्हीएम मशिनमध्ये बंदिस्त झाले असले तरी उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे. जळगावमधील मतदानानंतर ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम मशिन ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रूमचे डिस्प्ले चार मिनिटांसाठी बंद झाले. यानंतर उमेदवारांना धडकी भरली असून या माहितीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दुजोरा दिला आहे.

अनेक मतदारसंघांतील स्ट्राँग रूमच्या कॅमे-याच्या तक्रारी यावर्षी समोर आल्या आहेत. बारामती, शिरूरसह अनेक ठिकाणी ईव्हीएम मशिन ठेवलेल्या स्ट्राँग रूममधील कॅमेरे बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत. अहमदनगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी तर थेट व्हीडीओ देखील शेअर केला. यानंतर आता जळगावमध्ये हाच प्रकार घडला आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर आणि जळगाव लोकसभेसाठी १३ मे रोजी मतदान झाले होते.

या मतदानानंतर दोन्ही लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आले आहे. परंतु रविवारी २६ मे रोजी सकाळी ९ वाजेपासून सीसीटीव्ही कॅमे-याचा डिस्प्ले बंद झाले. हे डिस्प्ले सकाळी ९.०४ मिनिटांपर्यंत म्हणेज चार मिनिटे बंद होते. त्यामुळे खळबळ उडाली. ही माहिती महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांनी त्वरित जिल्हाधिका-यांना कळवली.

वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे जनरेटरवरून इन्व्हर्टरवर वीज पुरवठा स्थलांतरित करताना सीसीटीव्ही कॅमे-याचा डिस्प्ले बंद झाला होता, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्टीकरण दिले. डिस्प्ले बंद झाले असले तरी सर्व ३६ सीसीटीव्ही कॅमे-यांचे फुटेज आपल्याकडे उपलब्ध आहे. तसेच त्याचे व्हीडीओ शूटिंग उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR