28.4 C
Latur
Saturday, January 11, 2025
Homeमहाराष्ट्रपुणे विद्यापीठातील ललित कला केंद्र तोडफोड; पोलीस उपनिरीक्षक निलंबित

पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्र तोडफोड; पोलीस उपनिरीक्षक निलंबित

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या आवारात तोडफोड प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सचिन गाडेकर यांना निलंबित करण्यात आले. या घटनेवेळी बंदोबस्तास असलेल्या पोलिसांकडूनच हलगर्जीपणा झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सचिन गाडेकर यांना निलंबित करण्यात आले आहे, याबाबत अतिरिक्त पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी निलंबनाचे आदेश दिले असल्याची माहिती मिळत आहे, दरम्यान गाडेकर यांच्याकडून घटनेची योग्य दखल न घेतल्याने ही कारवाई झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक गाडेकर यांना बळीचा बकरा बनवला जात असल्याच प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.

पोलीसांनी जाणीवपूर्वक तोडफोड होऊ दिली का?
शनिवारी संध्याकाळी पाच वाजता या ठिकाणचा पोलीस बंदोबस्त अचानक बाजूला करण्यात आला. ज्यामुळे भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना तोडफोड करण्यासाठी रान मोकळे झाले. त्यानंतर पोलीसांनी जाणीवपूर्वक ही तोडफोड होऊ दिली का? हा प्रश्न विद्यापीठाच्या आवारात विचारला जात आहे. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सचिन गाडेकर यांचे निलंबन करण्यात आले. मात्र विद्यापीठात बंदोबस्तासाठी पन्नासहून अधिक पोलीस तैनात असताना तोडफोड झालीच कशी? अचानक पोलीस कॉन्स्टेबलना बाजूला होण्याच्या सुचना कोणी दिल्या? या घटनेचे खापर एकट्या पोलीस उपनिरीक्षक गाडेकर यांच्यावर का फोडले जात आहे? या प्रश्नांची उत्ते पुणे पोलिसांकडून अद्याप देण्यात आलेली नाहीत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR