25.2 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रऑलिम्पिकवीर स्वप्नीलच्या स्वागतासाठी कोल्हापुरात जय्यत तयारी

ऑलिम्पिकवीर स्वप्नीलच्या स्वागतासाठी कोल्हापुरात जय्यत तयारी

कोल्हापूर : प्रतिनिधी
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळे याची आज बुधवारी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सकाळी ९ वाजता कावळा नाका येथील महाराणी ताराराणी यांच्या पुतळ्यापासून स्वागत मिरवणूक निघणार आहे.

त्यानंतर दसरा चौकात सत्कार समारंभ होणार असून या समारंभात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी केले. या जंगी मिरवणुकीत ढोल-ताशा, हलगी, झांज पथक सहभागी असतील तर स्वप्नीलवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे.

या कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR