38.5 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रसुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर रंगणार सामना

सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर रंगणार सामना

मुंबई : चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना तिकीट दिले आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला असता प्रतिभा धानोरकर या दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी असून एक ओबीसी चेहरा म्हणून त्या काँग्रेससाठी विजयी उमेदवार ठरू शकतात. शिवाय, त्या ज्या मतदारसंघाचे नेतृत्व करतात त्यात मोठ्या प्रमाणात ओबीसी वोटबँक असल्याने त्यांना विजय संपादन करणे अधिक सोयीचे जाणार असल्याचे देखील बोलले जात आहे.

अशातच आता या मतदारसंघातून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिल्याने त्यांची थेट लढत ही भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याविरुद्ध होणार आहे. २०१९ मध्ये काँग्रेसला केवळ चंद्रपूर मतदारसंघात विजय मिळवणे शक्य झाले होते. त्यामुळे या मतदारसंघात जातीचे समीकरण अतिशय महत्त्वाचे ठरणार असून चंद्रपूरकर पुन्हा प्रतिभा धानोरकर यांच्या रूपाने काँग्रेसला साथ देतात की भाजपला, हे पाहणे फार उत्सुकतेचे ठरणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR