35.4 C
Latur
Monday, March 17, 2025
Homeमहाराष्ट्र१२ ते १४ जानेवारी दरम्यान साखर परिषद

१२ ते १४ जानेवारी दरम्यान साखर परिषद

पुणे – प्रतिनिधी : ‘जागतिक साखर उद्योगातील शाश्वतता, आव्हाने आणि संधी’ या विषयावर येत्या दि. १२ ते १४ जानेवारी दरम्यान तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने परिषदेचे आयोजन केले आहे.
राज्याचे सहकारमंत्री आणि इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत सांगितली. महासंचालक संभाजी कडू पाटील, सल्लागार शिवाजीराव देशमुख हे उपस्थित होते.

परिषदेच्या निमित्ताने साखर उद्योगविषयक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत. तीन दिवसीय परिषदेत ऊस आणि साखर उद्योगाला चालना देणारे आणि कृषि क्षेत्राला उपयुक्त अशी एकूण १३ सत्रे आणि ६३ व्याख्याने होणार आहेत.

तसेच साखर उद्योग क्षेत्रातील जागतिक पातळीवर आर्थिक शिस्त आणि व्यवस्थापन आणि ग्रीन हायड्रोजन, बायो इथेनॉल, पर्यावरण, उसाचे नवीन वाण, आधुनिक सिंचन पद्धती, रोग आणि कीड नियंत्रण, आधुनिक लागवड पद्धती, आदी विषयांवर परिषदेत चर्चा करण्यात येणार आहे. परिषदेत जगातील २७ देशांचा सहभाग आणि प्रदर्शनात २५०० उद्योजक, शास्त्रज्ञ, संशोधक सहभागी होतील. परिषदेच्या निमित्ताने स्वतंत्र शेतकरी दालन तयार केले जाणार आहे. तेथे यशस्वी ऊसउत्पादक शेतकरी यांच्या यशोगाथा ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून पहावयास मिळणार आहेत. प्रदर्शनास विविध क्षेत्रांतील दीड ते दोन लाख शेतकरी भेट देणार आहेत असे त्यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR