30.6 C
Latur
Saturday, March 2, 2024
Homeधाराशिवतुळजापूर शहरात विवाहितेची आत्महत्या

तुळजापूर शहरात विवाहितेची आत्महत्या

धाराशिव : प्रतिनिधी
माहेरवरून संसारोपयोगी साहित्य व एक लाख रूपये घेऊन ये, असा सतत तगादा लावल्याने वैतागलेल्या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तुळजापूर शहरातील हडको येथे दि. १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाणे येथे दि. ११ रोजी पतीसह सासू, सास-यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिवरी ता. तुळजापूर येथील शिवानंद विलास पाटील यांची मुलगी गायत्री हिचा तुळजापूर शहरातील हडको येथील अतिश संजय देवकर यांच्याशी विवाह झाला होता. लग्न झाल्यापासून गायत्रीला सासरचे लोक सतत करणीधरणीसाठी त्रास देत होते. माहेरहून संसारोपयोगी साहित्य आण व एक लाख रूपये घेऊन ये, म्हणत छळ करीत होते. या त्रासाला व छळाला कंटाळून गायत्री अतिश देवकर वय २१ या विवाहितेने दि. १० रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

या प्रकरणी आरोपी अतिश संजय देवकर, स्वाती संजय देवकर, संजय मोहन दरेकर या तीघांच्या विरोधात शिवानंद विलास पाटील रा. चिवरी यांनी दि. ११ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पोलीस ठाणे येथे भा.दं.वि. सं. कलम- ४९८ (अ), ३२३, ५०४, ३०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR