27.1 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeराष्ट्रीय५ वर्षांत ७०० हून अधिक जवानांच्या आत्महत्या

५ वर्षांत ७०० हून अधिक जवानांच्या आत्महत्या

नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षांत केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या (सीएपीएफ) ७०० हून अधिक जवानांनी आत्महत्या केल्या आहेत. तसेच, या कालावधीत ५५,५५५ जणांनी राजीनामा आणि स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. दरम्यान, विभाग किंवा यंत्रणेकडून त्रास होत असल्याने आत्महत्या केल्याचे असे एकही प्रकरण समोर आलेले नाही. गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी बुधवारी राज्यसभेत प्रश्नांच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

नित्यानंद राय म्हणाले की, २०२० मध्ये सीएपीएफमध्ये १४४ आत्महत्या झाल्या होत्या, तर २०२१ मध्ये १५७ प्रकरणे समोर आली. तसेच, २०२२ मध्ये १३८, २०२३ मध्ये १५७ आणि २०२४ मध्ये १३४ आत्महत्या झाल्याची प्रकरणे नोंदवली गेली होती. सीएपीएफमध्ये पाच वर्षात एकूण ७३० आत्महत्या झाल्या. तसेच, गेल्या पाच वर्षांत ४७,८९१ सीएपीएफ जवानांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे आणि ७,६६४ जणांनी राजीनामा दिला आहे.

केंद्रीय सशस्त्र पोलिस दलामध्ये साधारणपणे आठ तासांच्या शिफ्टमध्ये काम केले जाते, असे नित्यानंद राय यांनी सांगितले. केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांतर्गतमध्ये आसाम रायफल्स, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलिस दल, इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक आणि सशस्त्र सीमा बल यांचा समावेश असून हे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते.

१ लाखाहून अधिक पदे रिक्त
सीएपीएफ आणि आसाम रायफल्समध्ये १ लाखाहून अधिक पदे रिक्त असल्याचे गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी बुधवारी राज्यसभेत सांगण्यात आले. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, ३० सप्टेंबरपर्यंत सीएपीएफ आणि आसाम रायफल्सची एकूण तैनाती संख्या ९,४८,२०४ होती. रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी सरकार पावले उचलत आहे असे गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR