नाशिक : बुधवारी सकाळच्या सत्रामध्ये आवक वाढ झाली असून जवळपास ५० हजार क्विंटलहून अधिक कांद्याची आवक झाली. कांद्याला समाधानकारक भाव मिळत असून आवक वाढत असल्याचे चित्र आहे. बुधवारी सत्रातील बाजार अहवालानुसार पुणे बाजार समितीत सर्वाधिक १७ हजार क्विंटलची आवक झाली.
राज्यातील काही निवडक बाजार समित्यांमध्ये लिलाव पार पडले आहेत. यात लासलगाव, पुणे, कामठी, कल्याण, पिंपळगाव बाजार समित्यांमध्ये लाल कांद्यासह उन्हाळ कांद्याची आवक झाली आहे. लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला सरासरी १७०० रुपये दर मिळाला.
तर उन्हाळ कांद्याला १५५० रुपये दर मिळाला. त्यानुसार आज दरात घसरण झाल्याचे बघायला मिळाले. तर पिंपळगाव बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला सरासरी १६५० दर मिळाला.