18 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeमहाराष्ट्रसुनील तटकरे अपयशी खासदार, पडणार

सुनील तटकरे अपयशी खासदार, पडणार

मुंबई : प्रतिनिधी
महायुतीमधील घटक पक्ष असलेले शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही. भाजपाने एकमागून एक उमदेवार घोषित केले आहेत. असे असले तरी उमेदवारीवरून अनेक कयास बांधले जात आहेत. रायगडमधून सुनील तटकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. यावरून जयंत पाटील यांनी टीका केली आहे.

तिकिट वाटप अंतिम झाले की, देशातील चित्र बदललेले दिसेल. सुनील तटकरे अपयशी खासदार असून, ते पडणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यांच्यासोबत असलेले कार्यकर्तेही असेच सांगतात. अनेक जण नाइलाजाने त्यांच्यासोबत असल्याचेही अनेकांकडून ऐकायला मिळते, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. तसेच अनंत गिते यांनी भले कमी काम केले असेल. परंतु, त्यांचा जिल्ह्यातील जनसंपर्क चांगला आहे. विशेष म्हणजे अनंत गीते यांच्यावर कोणताही डाग नाही. हे त्यांचे मोठे भांडवल आहे, असे शेकाप नेते जयंत पाटील यांनी सांगितले.

पाच वर्षांत काही कामे केली नाहीत
सुनील तटकरे यांच्यावर टीका करताना शेकाप नेते जयंत पाटील यांनी सांगितले की, जनतेची थोडीथोडकी कामे केली असली, तरी आमच्याशी संपर्क ठेवला नाही, हा आमचा राग होता. मात्र, पाच वर्षांत खासदार म्हणून कामे करायला हवीत, ती त्यांनी केली नाहीत आणि आता कोणत्या तोंडाने मते मागायला येतात, अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR