32.6 C
Latur
Monday, February 26, 2024
Homeमहाराष्ट्रसुन्नी धर्मगुरूंना घाटकोपरमध्ये अटक; समर्थकांच्या राड्यानंतर मुंबई पोलिसांचा लाठीचार्ज

सुन्नी धर्मगुरूंना घाटकोपरमध्ये अटक; समर्थकांच्या राड्यानंतर मुंबई पोलिसांचा लाठीचार्ज

मुंबई : इस्लामचे मार्गदर्शक मुफ्ती सलमान अजहरी यांना गुजरात पोलिसांनी घाटकोपरमधून अटक केल्यानंतर घाटकोपरमध्ये तणाव वाढल्याचे पहायला मिळाले. या ठिकाणी समर्थकांच्या मोठ्या जमावानंतर, त्यांनी बराच वेळ रास्ता रोको केल्यानंतर पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी सौम्य लाठीचार्ज केला.

सलमान मुफ्ती अजहर यांना घोटकोपरमध्ये अटक केल्याची बातमी समजल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याची स्थिती निर्माण झाल्यानंतर मुफ्ती यांनी पोलिस ठाण्याच्या खिडकीतून सगळ्यांना शांत राहण्याचे आणि रस्ता मोकळा करण्याचे आवाहन केले. पण तरीही त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली आणि घोषणाबाजी सुरूच ठेवली. जुनागढमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुजरात एटीएसने मुफ्ती यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ३१ जानेवारीला जुनागड गुजरातला एक भाषण मुफ्ती सलमान अझरी यांनी एक भाषण केले होते. त्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. सलमान मुफ्ती अजहर हे सुन्नी धर्मगुरू आहेत. गुजरातमध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर मुफ्ती सलमान अजहरी यांच्यावर कलम १५३ इ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गुजरात एटीएसने मुफ्ती सलमान यांना घाटकोपर येथून ताब्यात घेतले.

समर्थकांच्या राड्यानंतर पोलिस आक्रमक
मुफ्ती सलमान अजहरी यांना गुजरात एटीएसने अटक केल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी घाटकोपरमध्ये मोठी गर्दी केली आणि रास्ता रोको केला. त्यानंतर पोलिसांनी आवाहन करूनही समर्थकांनी मागे हटण्यास नकार दिला. त्यानंतर स्वत: डीसीपी हेमराज राजपूत हे रस्त्यावर उतरले आणि त्यांनी रस्ता मोकळा करण्यास सुरूवात केली. समर्थकांच्या हुल्लडबाजीनंतर पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी रास्ता रोको करणा-या जमावावर सौम्य लाठीचार्ज केला. घाटकोपरचा एलबीएस मार्ग हा अत्यंत महत्त्वाचा असून तो मुफ्ती यांच्या समर्थकांनी सकाळपासून रोखूुन धरला होता. त्यामुळे आता पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली असून रास्ता रोको करणा-या समर्थकांवर लाठीचार्ज केला

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR