नवी दिल्ली : या वर्षी जूनमध्ये टी-२० वर्ल्ड कप खेळला जाणार आहे, अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सामने होणार आहेत. दरम्यान, गेल्या वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय संघाची घोषणा करण्यात आली. आयसीसीने जाहीर केलेल्या ११ खेळाडूंमध्ये जगभरातील खेळाडूंसोबतच भारतीय संघातील खेळाडूंनाही स्थान मिळाले. विशेष म्हणजे टीम इंडियाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवण्यात आले आहे.
आयसीसीने या संघात ज्या ११ खेळाडूंचा समावेश केला आहे, त्यात पहिले नाव यशस्वी जैस्वालचे आहे. जैस्वालला गेल्या वर्षीच टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. यानंतर तो सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. त्याच्यासह इंग्लंडच्या फिल सॉल्टला दुसरा सलामीवीर म्हणून स्थान देण्यात आले आहे. सॉल्टने गेल्या वर्षी टी-२० मध्ये चांगली कामगिरी केली होती.
वेस्ट इंडिजच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असलेल्या निकोलस पूरनला आयसीसी संघात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून स्थान देण्यात आले आहे. गेल्या वर्षी त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळलेल्या १३ डावांपैकी केवळ ३ वेळा त्याला दुहेरी आकडा गाठता आला नाही.
भारताच्या सूर्यकुमार यादवची केवळ संघात निवड झाली नाही, तर त्याला या संघाचा कर्णधारही बनवण्यात आले आहे. टी-२० मधील आयसीसी क्रमवारीतही तो अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे.
न्यूझीलंडचा मार्क चॅपमन, झिम्बाब्वेचा सिकंदर रझा, युगांडाचा अल्पेश रमाझानी, आयर्लंडचा मार्क अडायर हे संघात आहेत. भारताचा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईही या संघात आपली जागा निश्चित करण्यात यशस्वी ठरला आहे. या संघात झिम्बाब्वेचा रिचर्ड नगारावा आणि भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग देखील दिसत आहे.
आयसीसी पुरुषांचा टी-२० संघ – सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, फिल सॉल्ट, निकोलस पूरन, मार्क चॅपमन, सिकंदर रझा, अल्पेश रामजानी, मार्क अडायर, रवी बिश्नोई, रिचर्ड नागरवा, अर्शदीप सिंग.