23.1 C
Latur
Monday, July 22, 2024
Homeअंतरराष्ट्रीयथांबलेली दूरसंचार सेवा गाझामधील लोकांवरील अत्याचार लपवेल : ह्यूमन राइट्स वॉच

थांबलेली दूरसंचार सेवा गाझामधील लोकांवरील अत्याचार लपवेल : ह्यूमन राइट्स वॉच

मानवी हक्कांवर आणखी अत्याचार, संघर्ष कव्हर करताना २९ पत्रकारांचा मृत्यू

न्यूयॉर्क : ह्यूमन राइट्स वॉचच्या एका वरिष्ठ अधिका-याने म्हटले आहे की, गाझामधील दूरसंचार सेवा जवळजवळ पूर्ण बंद केल्याने तेथील मोठ्या संख्येने लोकांवर होत असलेल्या अत्याचारांवर लपवेल जाईल. ुमन राइट्स वॉचमधील वरिष्ठ तंत्रज्ञान आणि मानवाधिकार संशोधक डेबोरा ब्राउन यांनी एका ऑनलाइन पोस्टमध्ये म्हटले आहे की, गाझामध्ये सुरू असलेल्या माहितीच्या ब्लॅकआउटमुळे लोकांवरील अत्याचार लपविण्याचा धोका आहे. यामुळे मानवी हक्कांवर आणखी अत्याचार होऊ शकतात.

याआधी, कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्टनेही (सीपीजे) तेथील माहितीच्या ब्लॅकआउटवरचिंता व्यक्त केली होती. तेथे लवकरात लवकर दळणवळण सेवा पूर्ववत करावी, असे समितीने म्हटले होते. त्याच्या अनुपस्थितीमुळे जगाला या संघर्षाची माहिती मिळत नसल्याचे संघटनेने म्हटले आहे. गाझा पट्टीतून येणा-या अर्पु­या माहितीमुळे घातक प्रचार आणि चुकीची माहिती मिळू शकते, असे संघटनेने म्हटले आहे. सीपीजेने सांगितले की, ७ ऑक्टोबर रोजी इस्राईलवर हमासच्या हल्ल्यानंतर संघर्ष कव्हर करताना २९ पत्रकारांचा मृत्यू झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR