34.9 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रउदयनराजेंच्या तिकिटावरून सस्पेन्स?

उदयनराजेंच्या तिकिटावरून सस्पेन्स?

समर्थक भाजपविरोधात आक्रमक

मुंबई : साता-यात अजूनही भाजपने उदयनराजे भोसले यांची उमेदवारी का जाहीर केली नाही, म्हणून उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी भाजपला थेट इशारा दिला आहे. साता-यातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी न दिल्यास उदयनराजे भोसले यांचे समर्थक भाजपाचा राजीनामा देणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीत भाजपची जागा भाजपच लढवणार की मग यंदा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दिली जाणार? याबद्दल अद्याप पेच आहे. पण जागा भाजपची आहे तर मग दिरंगाई का? असा सवाल करत उदयनराजे भोसले यांचे समर्थक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत.

साता-यातून लोकसभेसाठी मविआकडून श्रीनिवास पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्यासह पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव चर्चेत आहे. तर भाजपकडून उदयनराजे भोसले यांच्यासह अतुल भोसले यांचेही नाव घेतले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR