रेणापूर : प्रतिनिधी
ग्रामीण भागातील किशोरी मुलीमध्ये क्रिडा क्षेञाची आवड नर्मिाण व्हावी आणि क्रिडा क्षेञात किशोरी उत्तुंग भरारी मारुन करीअर घडवावे या उद्देशाने क्राय संस्था मुंबई आणि कलापंढरी संस्था पानगाव च्या वतीने दिनांक १० डिसेंबर रोजी रविवारी रेणापूर येथील श्रीराम माध्यमिक व उच्च माध्यमिक वद्यिालयाच्या प्रांगणामध्ये तालूका स्तरीय किशोरी क्रिडा महोत्सवाचे आयोजन कलापंढरी संस्थेचे अध्यक्ष बी पी सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत करण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेचे उद्घाटन श्रीराम माध्यमीक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सतिष गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आले. सांस्कृतीक विभागाचे अमृतेश्वर स्वामी, क्रीडा विभागाचे एस एन भातांब्रे, कलापंढरी संस्थेचे सचिव अनिरुद्ध जंगापल्ले, गरज सूर्यवंशी, सविता कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती तर समारोप प्रसंगी प्राचार्य जेष्ठ विचारवंत माधव गादेकर,कलापंढरी संस्थेचे अध्यक्ष बी पी सुर्यवंशी,संस्था सचिव अनिरुद्ध जंगापल्ले,सविता कुलकर्णी,के वाय पटवेकर,सुजित कुमार गायकवाड,कालीदास गायकवाड यांची उपस्थिती होती. या किशोरी क्रीडा महोत्सवात किशोरी मुलींनी क्रिकेट, कब्बडी, खो-खो आदी खेळ खेळले यात तालूक्यातील पानगाव, बिटरगाव, तळणी ,रेणापूर,तसेच चाकूर तालूक्यातील वडवळ,सेवापूर तांडा येथील किशोरी मुलींनी सहभाग घेतला होता.
या मध्ये क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारीतोषीक पानगाव येथील संघाने पटकावले तर द्वितीय क्रमांक तळणी संघाने पटकावले तर कब्बडी मध्ये प्रथम क्रमांकाचे वडवळ,द्वितीय क्रमांकाचे बिटरगाव, तर उत्तेजनार्थ रेणापूर संघाने पटकावले,तर खोखो स्पर्धेत प्रथम क्रमांक बिटरगाव, व्दितीय तळणी आदी संघाने पारीतोषीक पटकावले, मान्यवरांच्या हस्ते प्रथम ,द्वितीय तृतीय तसेच उत्तेजनार्थ पारीतोषिक विजेत्यां संघाला स्मृतीचिन्ह, प्रमाणपञ व पुष्प गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी सहभागी किशोरींनी जिल्हा स्तरीय स्पर्धा घेण्यासाठी मागणी केली. हा क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सुरज सुर्यवंशी,माया ताई सोरटे,मधुकर गालफाडे, प्रतिमा कांबळे, शालूताई साके, सुप्रिया गोरे,फराना शेख,राजेश्री मोटाडे, दिपाली ढाले, संदीप संपत्ते, सुप्रिया रामदासी, विलास दंद्दे, मंगेश बरुडे,अतूल वाकडे, सुरेश हाके,कोमेश कसबे, आदींनी परिश्रम घेतले. सुञसंचलन मधुकर गालफाडे यांनी केले तर आभार सुरज सूर्यवंशी यांनी मानले.