22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeसोलापूरगटबाजीच्या राजकारणामुळे तालुका रसा तळाला गेला : महेश चिवटे

गटबाजीच्या राजकारणामुळे तालुका रसा तळाला गेला : महेश चिवटे

करमाळा (प्रतिनिधी) स्वतःच्या नावाचे गट तयार करून राजकारणात या गटामार्फत आर्थिक व सत्तेचा सौदा करणाऱ्या प्रवृत्तीमुळे तालुका रसातळाला गेला असून विकास कामाला खीळ बसत आहे.यामुळे तालुक्यातील इथून पुढे गटबाजी चे राजकारण संपून पक्षीय राजकारण तयार झाले तरच तालुक्यात विकास कामे होतील व सर्वसामान्य कार्यकर्ते सत्तेत येतील असे मत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी व्यक्त केले.

देवळाली येथे टेल्को कंपनीत कामगार युनियन मध्ये बिनविरोध निवडून आलेले औदुंबर गणेशकर व जिल्हा नियोजन मंडळाचे नूतन सदस्य महेश चिवटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना महेश चिवटे म्हणाले की राहुल कानगुडे सारखा तरुण कार्यकर्ता तालुका पातळीवर राजकारणात आला पाहिजे.देवळाली मधील प्रत्येक नागरिकाच्या समस्या सोडवण्यासाठी कानगुडे सदस्य असतात.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली देवळाली येथे शिवसेना मजबूत असून येणाऱ्या काळात देवळाली ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा फडकून देवळाली चा विकास करेल असा विश्वास व्यक्त केला.राहुल कानगुडे म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला निधी राजकीय द्वेष मधून परत पाठवण्याचे पाप सत्ताधारी करत आहे.

यावेळी औदुंबर गणेशकर म्हणाले देवळाली ग्रामस्थांच्या उपकारामधून मुक्त होण्यासाठी इथून पुढे विकासाच्या कामासाठी मदत करणार असल्याचे सांगितले.या कार्यक्रमासाठी शिवसेना करमाळा विधानसभा अध्यक्ष राहुल कानगुडे माजी पंचायत समिती सभापती गहिनीनाथ ननवरे सतीश कानगुडे सोसायटीचे चेअरमन बापूसाहेब कानगुडे अण्णासाहेब शिंगाडे रमेश गायकवाड माजी सरपंच बाळासाहेब शिंदे गोरख पवार सचिन ढेरे युवा सेना उपजिल्हाप्रमुख श्रीकांत गोसावी सौदागर बिचितकर कैलास बिचीतकर कुंडलिक कानगुडे प्रफुल्ल दामोदरे निवृत्ती पडवळे आप्पासाहेब गणेश कर सुनील कानगुडे नितीन दामोदरे नितीन रकानगुडे विठ्ठल गोसावी सुधीर आवटे चेतन राखुंडे दादा शेख भरत चोपडे भैय्या राज गोसावी गणेश साळवे रवी गणेश कर विलास चव्हाण निलेश कानगुडे सोमा साळवे मोहन आवटे हनुमंत वीर आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR