38.5 C
Latur
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबई -आग्रा महामार्गावर शिक्षकांच्या कारला अपघात; चार गंभीर

मुंबई -आग्रा महामार्गावर शिक्षकांच्या कारला अपघात; चार गंभीर

नाशिक : मुंबई – आग्रा महामार्गावरील व्हिटीसी फाट्याजवळ आज सोमवारी १२ वाजेच्या सुमारास मुंबईहुन नाशिककडे जाणा-या एका भरधाव अज्ञात कंटेनरने कार (क्रमांक एमएच १५ ए १६८८ ) ला जोरात कट मारला. त्यामुळे कार पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात चार शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघातात कमलाकर शिंदे, वय ५३, अरुण भामरे, वय ५०, माणिक योगेश सावकारे, अनिल रामभाऊ जाधव, वय ४८ सर्व रा. नाशिक हे प्राथमिक शाळेतील चार शिक्षक गंभीर जखमी झाले. हे सर्वजण इगतपुरी तालुक्यातील वाघेरे केंद्रातील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आहेत.

वाघेरे येथुन शाळा सुटल्यावर हे सर्व शिक्षक नाशिकला जात असतांना अपघात झाला. अपघात घडल्याची माहिती समजताच जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची मोफत रुग्णवाहिकेचे चालक निवृत्ती गुड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सर्व जखमी व्यक्तींना पुढील उपचारासाठी नाशिक येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR