मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या टेस्ट सामन्यात भारताच्या महिला ब्रिगेडने ३४७ धावांनी दिमाखदार विजय मिळवला आहे. पहिल्या डावात भारतीय महिला संघाने ४२८ धावांचा डोंगर उभारला होता. त्याला प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा संघ गडगडला. त्यांना फक्त १३६ धावा करता आल्या. त्यानंतर दुस-या डावात १८६ धावा करत भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी ४७८ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, दीप्ती शर्माच्या फिरकीसमोर इंग्लंडचे खेळाडू फेल ठरले अन् महिला ब्रिगेडने ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
टीम इंडिया प्लेईंग इलेव्हनने स्मृति मंधाना (कॅप्टन), शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (विकेटकीपर), स्रेह राणा, शुभा सतीश, पूजा वस्त्राकर, रेणुका ठाकूर सिंह आणि राजेश्वरी गायकवाड.
इंग्लंड क्रिकेट टीम हीथर नाईट (कर्णधार), टॅमी ब्यूमोंट, सोफिया डंकले, नेट सायवर-ब्रंट, डेनिएल व्याट, एमी जोन्स (विकेटकीपर), सोफी एक्लेस्टोन, चार्लोट डीन, केट क्रॉस, लॉरेन फाइलर आणि लॉरेन बेल.