17.3 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeसोलापूरकचरा समस्येवर मात करण्यासाठी दहा घंटागाड्या दाखल

कचरा समस्येवर मात करण्यासाठी दहा घंटागाड्या दाखल

सोलापूर : शहरांमध्ये निर्माण झालेल्या कचरा समस्यावर मात करण्यासाठी घंटागाड्यांच्या ताफ्यात पाच टनाच्या दहा मोठ्या गाड्या दाखल झाल्या आहेत. या गाड्यांमुळे कचरा संकलनाची मर्यादा वाढणार आहे. कचरा संकलनही लवकर होणार असल्याने वेळ आणि पैसा वाचणार आहे.

दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात कचरा साठला होता. ठीक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साठले होते. तुळजापूर रोडवरील कचरा डेपोमध्ये कचरा ठेवण्यासाठी जागा नव्हती अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक घंटागाड्या नादुरूस्त असल्याने कचरा संकलनावर मर्यादा आल्या होत्या. यावर मात करण्यासाठी मक्तेदारांकडून १७ नवीन घंटागाड्या खरेदी केल्या आहे.

दहा गाड्यांची क्षमता तीन टन व सात गाड्यांची क्षमता पाच टन आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा संकलन करण्यास मदत होणार आहे. सध्या शहारात १८० घंटागाड्याच्या माध्यमातून कचरा संकलन केला जात आहे. त्यासाठी ४८० कर्मचारी आहेत. घरोघरी घंटागाडी येत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या; मात्र आरोग्य विभागाच्या माध्यमातून योग्य नियोजन करत घंटागाड्याचे गुगल मॅपिंग केले आहे. त्यामुळे कोणती घंटागाडी कोणत्या प्रभागात आहे. किती वेळ थांबली आहे कळत असल्याने मक्तेदारांवर घनकचरा विभागाची करडी नजर आहे.

शहरातील कचरा संकलन केलेला कचरा तुळजापूर रोडवरील कचरा डेपोमध्ये प्रक्रिया करण्यासाठी दिला जातो. मात्र या बायो प्रकल्पाची क्षमता कमी आहे. गोळा होणारा कचरा आणि प्रक्रिया करण्यात येणारा कचरा यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. परिणामी काही वेळा कचरा डेपोमध्ये कचरा ठेवण्यासाठी जागा नसल्याने प्रक्रिया न करता कचरा बाहेर टाकला जात असल्याच्या तक्रारी प्रकल्पाबाबत आहेत.
सध्या १८० घंटागाड्या, १४ आरसी मोठ्या गाड्या, दोन हुकलोडर, ४८० कर्मचारी, नवीन खरेदी केलेल्या १७ मोठ्या गाड्या अशी यंत्रणा आहे. सकाळच्या सत्रात १४० तर रात्रीच्या सत्रात ६० घंटागाड्या नियोजन करून घरोघरी घंटागाड्याच्या माध्यमातून कचरा संकलन केला जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR