21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयजम्मू-श्रीनगर रेल्वे लिंक प्रकल्पाची चाचणी पूर्ण

जम्मू-श्रीनगर रेल्वे लिंक प्रकल्पाची चाचणी पूर्ण

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा भाग असलेल्या कटरा-बडगाम रेल्वे मार्गावरील चाचणी रविवारी पूर्ण झाली. १८ डब्यांची ट्रायल ट्रेन कटरा रेल्वे स्थानकातून सकाळी ८ वाजता काश्मीरच्या दिशेने रवाना झाली. चाचणीचे पर्यवेक्षण करणा-या रेल्वे अधिका-यांनी सांगितले की, यूएसबीआरएलची ही शेवटची चाचणी आहे.

४१ हजार कोटी रुपये खर्चून बांधलेल्या यूएसबीआरएल प्रकल्पाची एकूण लांबी ३२६ किमी आहे. त्यापैकी १११ किमीचा रस्ता हा बोगद्यातून आहे. १२.७७ किमी. लांबीचा टी-४९ बोगदा हा या प्रकल्पातील सर्वात लांब आहे. त्याचबरोबर रियासी जिल्ह्यातील चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच रेल्वे पूलही बांधण्यात आला आहे. त्याची लांबी १३१५ मीटर आहे, तर नदीच्या पात्रापासून त्याची उंची ३५९ मीटर आहे. ते बांधण्यासाठीजम्मू-श्रीनगर रेल्वे लिंक प्रकल्पाची चाचणी पूर्ण
– ३२६ किमी मार्गावर १११ किमी बोगदे
– चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच रेल्वे पूल
श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा भाग असलेल्या कटरा-बडगाम रेल्वे मार्गावरील चाचणी रविवारी पूर्ण झाली. १८ डब्यांची ट्रायल ट्रेन कटरा रेल्वे स्थानकातून सकाळी ८ वाजता काश्मीरच्या दिशेने रवाना झाली. चाचणीचे पर्यवेक्षण करणा-या रेल्वे अधिका-यांनी सांगितले की, यूएसबीआरएलची ही शेवटची चाचणी आहे.

४१ हजार कोटी रुपये खर्चून बांधलेल्या यूएसबीआरएल प्रकल्पाची एकूण लांबी ३२६ किमी आहे. त्यापैकी १११ किमीचा रस्ता हा बोगद्यातून आहे. १२.७७ किमी. लांबीचा टी-४९ बोगदा हा या प्रकल्पातील सर्वात लांब आहे. त्याचबरोबर रियासी जिल्ह्यातील चिनाब नदीवर जगातील सर्वात उंच रेल्वे पूलही बांधण्यात आला आहे. त्याची लांबी १३१५ मीटर आहे, तर नदीच्या पात्रापासून त्याची उंची ३५९ मीटर आहे. ते बांधण्यासाठी सुमारे २० वर्षे लागली, तर त्यासाठी
१४८६ कोटी रुपये खर्च आला.

चिनाब पूल हा रेल्वेसाठी सर्वात आव्हानात्मक प्रकल्प होता. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडला त्याच्या बांधकामासाठी कार्यकारी एजन्सी आणि डिझाइन सल्लागार बनवण्यात आले. या प्रकल्पाच्या माध्यमातून भारतीय रेल्वेने आणखी एक यश संपादन केले आहे. अंजी खड्डावरील पूल हा भारतीय रेल्वेने बांधलेला पहिला केबल-स्टेड पूल आहे. हा पूल नदीपात्रापासून ३३१ मीटर उंचीवर बांधण्यात आला आहे. या पुलाच्या मध्यभागी बांधलेल्या टॉवरची (पॅलन) उंची १९३ मीटर आहे. त्याला आधार देण्यासाठी १०८६ फूट उंच टॉवर बांधण्यात आला आहे, जो जवळपास ७७ मजली इमारतीइतका उंच आहे.

अंजी नदीवर हा पूल बांधला आहे. हा पूल रियासी जिल्ह्याला कटराशी जोडतो. चिनाब पुलापासून त्याचे अंतर फक्त ७ किलोमीटर आहे. या पुलाची एकूण लांबी ७२५.५ मीटर आहे. यापैकी ४७२.२५ मीटर केबल्सवर आहेत. हा पूल ४ भागात विभागून बांधण्यात आला आहे. पुलाचा मधला भाग २९० मीटर आहे.
सुमारे २० वर्षे लागली, तर त्यासाठी

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR