19.4 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रठाकरे गटाचे नेते संजय कदम यांच्या कारला भीषण अपघात

ठाकरे गटाचे नेते संजय कदम यांच्या कारला भीषण अपघात

रायगड : रायगडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे रायगड लोकसभा मतदारसंघ समन्वयक संजय कदम यांच्या कारचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मुंबई कुर्ला मार्गावर प्रवास करताना संजय कदम यांच्या कारला आयशर ट्रकने मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई कुर्ला मार्गावर संजय कदम यांच्या कारला आयशरने मागून जोरदार धडक दिली. या धडकेत कारच्या मागच्या बाजूचा चुराडा झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी आयशर ट्रक ताब्यात घेतला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील रोहा मधून संजय कदम प्रचार सभा आटोपून मुंबईला परत जात होते. त्यावेळी वाटेत असताना त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संजय कदम यांच्यासह कारमधील अन्य व्यक्ती सुखरूप आहेत.
भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि भाजप नेते डॉ. परिणय फुके यांच्या गाडीचा काही दिवसांपुर्वी भीषण अपघात झाला होता. या अपघातात परिणय फुके सुदैवाने थोडक्यात बचावले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR