त्रिनिदाद : वृत्तसंस्था
दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यामध्ये आज टी-२० विश्वचषकाचा उपांत्य फेरीचा सामना पार पडला. या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सहज विजय मिळवून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. या सामन्यात अफगाणिस्तानच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण ते या सामन्यामध्ये पूर्णत: फेल झाले आणि अफगाणिस्तानचा संघ ५६ धावा करून सर्वबाद झाला. अफगाणिस्तान कोणत्याही खेळाडूने १० पेक्षा जास्त धावा केल्या नाही. अफगाणिस्तानचा फलंदाज अजमतुल्ला उमरझाईने सर्वाधिक १२ चेंडूंमध्ये १० धावा केल्या.
अफगाणिस्तानच्या या लाजिरवाण्या कामगिरीमुळे त्यांना सोशल मीडियावर बोलणी ऐकावी लागत आहेत. राशिद खानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तानचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ९ विकेट्सने पराभव झाला. आफ्रिकेने पहिल्या सामन्यात अफगाणिस्तान संघाचा ६७ चेंडू राखून पराभव केला. या सामन्यात अफगाणिस्तानची फलंदाजी खूपच खराब झाली होती. आफ्रिकेने अतिरिक्त सामन्यात जितक्या धावा दिल्या होत्या तितक्या धावा संघाच्या एकाही फलंदाजाला करता आल्या नाहीत. अफगाणिस्तानसाठी अजमतुल्ला उमरझाईने सर्वात मोठी खेळी खेळली, त्याने १२ चेंडूत २ चौकारांच्या मदतीने १० धावा केल्या.
अफगाणिस्तानच्या फलंदाजीत दुहेरी आकडा पार करणारा उर्मझाई हा एकमेव फलंदाज होता. दुसरीकडे अफगाणिस्तानच्या फलंदाजीदरम्यान आफ्रिकेने १३ अतिरिक्त धावा दिल्या होत्या. अशाप्रकारे, अफगाणिस्तानच्या डावात अतिरिक्त धावांपेक्षा बॅटने जास्त धावा झाल्या.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने इतिहासात पहिल्यांदाच एडन मार्करामच्या नेतृत्वाखाली विश्वचषकाच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या विश्वचषकातील कामगिरीवर नजर टाकली तर संघ अजुनपर्यत अपराजित राहिला आहे. संघाने अजुनपर्यत एकही सामना गमावलेला नाही. तर दुसरा सेमीफायनलचा सामना इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यामध्ये होणार आहे. यामध्ये जो संघ विजयी होईल तो संघ तो संघ दक्षिण आफ्रिकेशी अंतिम सामन्यामध्ये विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात लढेल. त्यामुळे आजच्या सेमी फायनल २ वर चाहत्यांच्या नजरा असणार आहेत.