धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यात व्यापारासाठी म्हणून आले अन राज्यकर्ते बनले, स्थानिकची सर्वसाधारण जनता मात्र वा-यावरच राहिली. केवळ निवडणुकीत पैशाचा वापर करत जनतेला विकत घेणे आणि पाच वर्षे त्याच जनतेला रेंगाळत ठेवणे पुणे, मुंबईतून फर्मान सोडणे, असा प्रकार आतापर्यंत दिसून आले आहे. प्रत्यक्षात मतदार संघात फिरायचे नाव घेणे नाही. असाच दिसून आला आहे. त्यामुळे आता परंडा विधानसभा मतदार संघात सत्तेचा माज संपला आता केवळ पैशाचा माज राहिला असून येत्या मतदान रुपातून तोही दाखविण्यात येईल, असा निर्धार परंडा मतदार संघातील जनतेने केला असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
धाराशिव जिल्ह्यात सावंत यांनी व्यापार करण्याच्या उद्देशाने पाउल टाकले. सुरवातीला त्यांनी परंडा विधानसभा मतदार संघातील सोनारीचा कारखाना, त्यानंतर वाशीचा कारखाना ताब्यात घेतला. या कारखान्यामुळे त्यांना हळूहळू आपण शेतक-यांचे नेते झाल्यासारखे वाटले. त्यानंतर त्यांनी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्यामुळे परंडा विधानसभा मतदार संघात राजकारणात प्रवेश करत यशही आले. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी त्यांना सुरवातीला आमदारकी त्यानंतर मंत्री पदही दिले. त्यामुळे त्यांना सत्तेचा व संपत्तीचा माज सुरु केला, अशी चर्चा या मतदार संघात सुरु आहे. पैसा व सत्तेमुळे त्यांनी ज्ञानेश्वर पाटील यांना तर बाजूला केलेच परंतू ज्या पक्षाने उमेदवारी दिली. त्या पक्षाच्या विरोधात जावून त्यांनी शिवसेना फोडण्यासाठी मोठे प्रयत्न केले, त्यासाठी आपण अनेक बैठका घेतल्याचे खुद्द सावंत यांनी जाहीर कार्यक्रमात सांगितले आहे.
त्यामुळे ज्या सहका-याने स्वत:ची उमेदवारी सावंताना दिली, असे ज्ञानेश्वर पाटील हे आज त्यांच्यापासून बाजूला गेले. विशेष म्हणजे ते हयात असताना त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले. तसेच ज्या पक्षाने आमदार केले मंत्री केले. त्या पक्षाला बाजूला सारले. याच पक्षातील अनेक आमदारांना फोडण्यासाठी त्यांचे मोठे प्रयत्न झाले. हा केवळ मागील पाच वर्षातील त्यांनी सत्ता व पेसा या जोरावर माज केला, आता सत्तेचा त्यांचा माज संपला आहे. आता याच मतदार संघातून पुन्हा ते आमदारकी लढवत आहेत. मात्र यावेळी त्यांना माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र रणजित पाटील यांची साथ राहिलेली नाही. त्याचबरोबर ज्या पक्षाने संधी दिली, त्या पक्षाबरोबर ते नाहीत. त्यांना आता ज्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षासोबत बसताना उलट्या, मळमळ होते.
तसेच मागील पाच वर्षात सत्तेत असताना मित्र पक्ष भाजपाला सोबत घेतलेले नाही. अशा पक्षाची साथ आहे, त्यामुळे मित्र पक्षातीलच पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज आहेत तर सर्वसामान्य नागरिकांना न भेटणा-या पुण्यातून जिल्ह्याची सुत्रे चालवणा-या सावंत यांचा आता सत्तेचा माज संपला आता येत्या निवडणूकीत पैशाचा माज जिरवणार असा निर्धार सर्वसामान्य मतदारांनी केला असल्याची जोरदार चर्चा भूम, परंडा, वाशी तालुक्यातील मतदांरामध्ये सुरु आहे.