22.3 C
Latur
Saturday, November 16, 2024
Homeसोलापूरलाडकी बहीण योजनेतून जमा झालेली रक्कम कर्ज हप्त्यापोटी जमा करून घेऊ नये : जिल्हाधिकारी

लाडकी बहीण योजनेतून जमा झालेली रक्कम कर्ज हप्त्यापोटी जमा करून घेऊ नये : जिल्हाधिकारी

सोलापूर : माझी लाडकी बहीणयोजनेत बँक खात्यात तीन हजार रुपये जमा झाले. लाडक्या बहिणी सुखावल्या. मात्र, काहींचे थकीत हप्ते कटल्याने त्या दुखावून गेल्या. दरम्यान, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी यात चांगलेच लक्ष घातले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेली रक्कम संबंधित लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यातून काढण्यास कोणत्याही प्रकारची मनाई करू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे, काही बँकांनी लाभार्थी महिलांच्या थकीत कर्जाचे हप्ते वसूल केले जात आहे. लाडकी बहीण योजनेतून जमा झालेली रक्कम कर्ज हप्त्यापोटी जमा करून घेऊ नये, अन्यथा संबंधित बँकांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिला आहे.

माझी लाडकी बहीण योजनेतून हस्तांतरित केलेले आर्थिक लाभ (रक्कम) कोणत्याही थकित कर्जाच्या बदल्यात समायोजित केले जाऊ नये. ही रक्कम लाभार्थीसाठी असून ती इतर कर्ज समायोजनासाठी वापरता येणार नाही. ही रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग केल्यानंतर लाभार्थी महिलांना कोणत्याही थकबाकीच्या समायोजनामुळे रक्कम काढण्यास नकार देण्यात येऊ नये. काही लाभार्थ्यांकडे बँकेचे प्रलंबित असलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे बँक खाते गोठविण्यात आले असल्यास सदर बैंक खाते तत्काळ सुरू करावा.

या योजनेतंर्गत लाभार्थ्यांना प्राप्त होणारी लाभाची रक्कम लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात यावी, अशा सूचना महिला व बाल विकास विभागाच्या सचिवांनी १९ ऑगस्टच्या पत्रानुसार दिलेल्या आहेत. या सूचनांचे बँकांनी पालन करावे.यासाठी जिल्हा अग्रणी बैंक व्यवस्थापक यांनी सर्व संबंधित बँकांना याबाबत सूचित करावे, असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR