27.5 C
Latur
Sunday, July 14, 2024
Homeअंतरराष्ट्रीयपाकिस्तानातील भिका-यांची वार्षिक कमाई ४२ अब्ज डॉलर्स!

पाकिस्तानातील भिका-यांची वार्षिक कमाई ४२ अब्ज डॉलर्स!

अबब । देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या १२ टक्क्यांपेक्षा जास्त कमाई, भिका-यांची होते निर्यात २,००० जणांचे रोखले पासपोर्ट

इस्लामाबाद : वृत्तसंस्था
मित्र देशांनीही पाकिस्तानकडे नेहमी भीक मागणारा देश म्हणून पाहण्यास सुरुवात केली आहे. आता तर पाकिस्तान खरोखरच त्या देशातील भिका-यांमुळे त्रस्त झाला आहे. त्यामुळे जवळपास २००० भिका-यांचे पासपोर्ट रोखून धरण्याची वेळ त्या देशावर आली.

पाकिस्तानात भीक मागणे हा एक संघटित व्यवसाय बनला आहे. नोक-यांचा अभाव आणि महागाईमुळे लोक भीक मागण्यासाठी प्रवृत्त होतात. २३ कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या या देशात, ३.८ कोटी भिकारी आहेत, ज्यांची नोंद झालेली आहे. कराचीमध्ये एक लाख ३० हजारांहून अधिक भिकारी आहेत. तर ३ लाख भिकारी दरवर्षी रमजानपूर्वी इतर शहरांतून येथे येतात.

कराचीमध्ये सरासरी २००० रुपये, लाहोरमध्ये १४०० रुपये आणि इस्लामाबादमध्ये ९५० रुपये एक भिकारी दररोज गोळा करतो. म्हणजेच प्रति भिकारी मिळणारी सरासरी रक्कम ८५० रुपये आहे. तेथील एकूण भिका-यांची वार्षिक कमाई ४२ अब्ज डॉलर आहे. ही रक्कम पाकिस्तानच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या १२ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

पाकिस्तानच्या मोठ्या शहरांमध्ये तसेच लहान शहरांमध्ये भीक मागणे हा संघटित व्यवसाय आहेच. शिवाय इतर देशांमध्ये देखील भिकारी ‘निर्यात’ केले जातात. तो देखील एक मोठा व्यवसाय आहे. सरकारने अलीकडेच दोन हजारांहून अधिक भिका-यांचे पासपोर्ट सात वर्षांसाठी ‘ब्लॉक’ करण्याचा निर्णय घेतला. कारण यामुळे इतर देशांमध्ये पाकिस्तानची बदनामी झाली आहे. पाकिस्तानी भिकारी प्रामुख्याने सौदी अरेबिया, इराण आणि इराकमध्ये जातात.

पाकिस्तानातील भिकारी मोठ्या प्रमाणात परदेशात जात आहेत, ज्यामुळे ‘मानवी तस्करी’ वाढली आहे. अनेक भिकारी सौदी अरेबिया, इराण आणि इराकमध्ये जाण्यासाठी यात्रेकरू व्हिसाचा गैरवापर करतात. परदेशात अटक करण्यात आलेले ९० टक्के भिकारी पाकिस्तानी वंशाचे होते. पाकिटमारीमध्येही पाकिस्तानी नागरिक होते. सध्या जपान अशा भिका-यांसाठी एक नवीन गंतव्यस्थान म्हणून उदयास येत आहे, असे विदेश मंत्रालयाचे सचिव झुल्फिकार हैदर यांनी सांगितले.

नॅशनल कौन्सिल फॉर सोशल वेलफेअरसाठी २०१० मध्ये कराचीमधील भिका-यांवर केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले की, मुलाखती घेतलेल्या ५८ टक्के भिका-यांनी पर्यायी नोक-या स्वीकारण्यास नकार दिला. भिकारी निर्मूलनासाठी सरकारने दीर्घकाळ संघर्ष केला. भिका-यांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचे आवाहनही करण्यात आले होते, मात्र तरीही पाकिस्तानातील भिका-यांची संख्या सातत्याने वाढत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR