27.7 C
Latur
Friday, February 28, 2025
Homeमहाराष्ट्रप्रसिद्ध वेण्णा लेकला जत्रेचे स्वरूप

प्रसिद्ध वेण्णा लेकला जत्रेचे स्वरूप

नववर्षाच्या स्­वागतासाठी पर्यटक महाबळेश्वर, पाचगणीत दाखल

महाबळेश्वर : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण विविध ठिकाणी फिरायला जात असतात. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळख असलेले महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांनी बहरले आहे. नौकाविहारासाठी प्रसिद्ध वेण्णा लेक परिसरात जत्रेचे स्वरूप आलेले पाहायला मिळत आहे. नौकाविहाराबरोबर खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत धमाल मस्ती केली जात आहे.

नववर्षाच्या स्वागतासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गिरिस्थान महाबळेश्वर व पाचगणी पर्यटकांनी बहरले आहे. याठिकाणच्या बाजारपेठाही विद्युत रोषणाईने सजल्या आहेत. नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत.

ऐन थंडीतही पर्यटक आईस्क्रीम, स्ट्रॉबेरी ज्यूस, क्रीम, आईस गोळ्यांच्या गाड्यांवर गर्दी करत आहेत. महाबळेश्वरसह आता पर्यटक तापोळा व पाचगणी येथे देखील गर्दी करत आहेत. येथील बाजारपेठेत मिळणा-या प्रसिद्ध वस्तू आणि पदार्थांच्या खरेदीसाठी पर्यटक गर्दी करत आहेत. येथील प्रसिद्ध चणे, जाम, जेली, चिक्की, चटकदार स्ट्रॉबेरी खरेदीसाठीही गर्दी होताना दिसत आहे. महाराष्ट्रासह विविध राज्यांमधून येथे येणा-या पर्यटकांची संख्या अधिक असून, सध्या सहलीही मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR