29.4 C
Latur
Saturday, April 13, 2024
Homeमहाराष्ट्रशहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच

शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच

- २५ हून अधिक जणांवर गुन्हे दाखल

पुणे : वानवडीतील आझादनगरमधील ज्येष्ठ दांपत्य तारा दीपक राय. तारा राय गृहिणी तर, पती दीपक राय सैन्यदलातून नाईक पदावरून निवृत्त झाले आहेत. रविवारी, १० मार्चला दुपारी चारच्या सुमारास राय दांपत्य मुंढव्यातील चर्चमध्ये प्रार्थनेसाठी गेले होते. सायंकाळी सहाला ते घरी परतले.

त्यावेळी त्यांना दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले. घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. कपाट उघडेच. तिजोरीत पाहिले असता त्यांना धक्काच बसला. ‘‘सोन्याचे दागिने आणि रोकड असा सुमारे २८ लाखांचा ऐवज चोरीस गेला होता.
आयुष्यभर कष्ट करून नातींच्या लग्नासाठी दागदागिने जमा केले होते. परंतु चोरट्यांनी सर्व दागिने, पैसे चोरून नेले.

वानवडी परिसरातच सात मार्चला आलिम शेख यांच्या दुकानातून दुपारी चोरट्यांनी ४६ हजार रुपयांचे दागिने आणि मोबाईल चोरून नेले. स्वारगेट परिसरात सॅलिसबरी पार्कमधील सत्यदेव तिवारींच्या दुकानातून २८ जानेवारीला पहाटे चोरट्यांनी ४३ हजारांचे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेली.

सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रूकमधील सदनिकेतून ९ मार्च रोजी चोरट्यांनी ६२ हजारांचे दागिने लांबवले. २८ फेब्रुवारीला दुपारी लोणीकंद परिसरात केसनंदमधील महिलेच्या घरातून एलसीडी, टिव्हीसह इतर साहित्य चोरीस गेले. हडपसर मांजरी येथील गोडावूनमधून आठ मार्चला चोरट्यांनी सव्वालाख रुपयांचा माल चोरून नेला

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR