नागपूर : कल्याणमध्ये एका मराठी कुटुंबाला अखिलेश शुक्ला या सरकारी अधिका-याने गुंडाकरवी मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचे पडसाद आता विधानसभेत उमटले आहेत.
या प्रकरणावर उबाठाचे आमदार सुनील प्रभु यांनी विधानसभेत आवाज उठवला होता. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकारी किती मोठ्या बापाचा असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल असे म्हणत त्यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले आहे.
उबाठाचे आमदार सुनील प्रभु कल्याणमध्ये मराठी माणसाला झालेल्या मारहाणीचा मुद्दा विधानसभेत मांडला. कल्याण येथील रहिवाशी सोसायटीत हिंदी भाषिक अखिलेश शुक्ला एमटीडीसीचे मॅनेजर यांनी मराठी कुटुंबावर हल्ला केला. शिव्या घातल्या, बाहेरची लोक आणून मराठी माणसाला मारहाण केल्याच्या घटनेकडे सभागृहाचे लक्ष वेधले.
मराठी माणसाचा मानसन्मान ठेवणार
या घटनेला गांभीर्याने घेत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, शिवसेनेचे आमदार सुनील प्रभु यांनी महत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. ही माहिती ताबडतोब तपासून तो अधिकारी किती मोठ्या बापाचा असला तरी त्यायी हयगय केली जाणार नाही, त्याच्यावर कारवाई केली जाईल. या कारवाईच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाचा मानसन्मान ठेवला जाईल, याची खात्री मी देतो, तसेच संबंधित प्रकरणावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दतो, असे अजित पवार यांनी सांगितले.
नेमके प्रकरण काय?
कल्याणच्या हायप्रोफाईल सोसायटीमध्ये अखिलेश शुक्ला नावाच्या व्यक्तीने सोसायटी बाहेरील माणसं आणून बिल्डिंगमधील मराठी कुटुंबाला लोखंडी रॉड, पाईप, काठया तसंच लाकडी पट्टयाने मारहाण केली आहे, यात दोन ते तीन जण जखमी झाल्याचे बोलले जात आहे.